
मुंबई – ‘कोचिन शिपयार्ड’मध्ये बांधण्यात आलेल्या ‘मालवण’, ‘मंगरोल’ आणि ‘माहे’ या ३ युद्धनौकांचे नुकतेच जलावतारण झाले. विविध शस्त्रास्त्रांनी सिद्ध असलेल्या या पाणबुडीविरोधी युद्धनौका आहेत. ‘मालवण’चे जलावतरण नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस अँडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते, ‘मंगरोल’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस अँडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते, तर ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस अँडमिरल पुनित बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले. समुद्रकिनारी असलेल्या शहरांची नावे या तिन्ही युद्धनौकांची दिली आहेत, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !