कर्नाटक विश्‍वविद्यालयाच्या प्राध्यापिकेच्या कक्षात जादूटोणा !

बाहुली आणि लिंबू आढळले !

धारवाड (कर्नाटक) – येथील कर्नाटक विश्‍वविद्यालयातील इतिहासाच्या साहाय्यक प्राध्यापिका डॉ. रमा गुंडूराव यांच्या कक्षामध्ये कुणीतरी काळी बाहुली, ३ लिंबू, हळद आणि कुंकू टाकल्याचे आढळून आले. प्रा. रमा गुंडूराव काही दिवस सुटीवर गेल्या होत्या. त्याकाळात त्यांच कक्ष बंद होता. त्या परत आल्यानंतर त्यांनी कक्ष उघडल्यावर या वस्तू आढळून आल्या. कक्षाची किल्ली त्यांच्याकडे असल्याने या वस्तू खिडकीतून टाकण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमागे वैयक्तिक भांडण असल्याचे सांगितले जात आहे. प्रा. रमा गुंडूराव यांचा जावई याच विभागात काम करतो. या कक्षावरून दोघांमध्ये वाद आहे. यातूनच ही घटना घडल्याचा संशय तेथील कर्मचारी व्यक्त करत आहेत.

संपादकीय भूमिका 

विश्‍वविद्यालये किंवा शिक्षणसंस्था या स्वतःला ‘पुरोगामी’ किंवा ‘आधुनिक विचारांचे माहेरघर’ समजतात. त्यामुळे विश्‍वविद्यालयातील एका प्राध्यापकाच्या कक्षात अशी घटना घडणे पुरो(अधो)गाम्यांसाठी लज्जास्पदच म्हणावी लागेल !