१ लाख रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाने बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ सहस्र ४२० रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
धर्मांधाकडून तलवारीची दहशत !
नवी मुंबई – दुकानातील माणसाने विद्युत् कर्मचार्याचा भ्रमणभाष क्रमांक न दिल्याने संतप्त होऊन माझ सफीक कुरेशी (वय २२ वर्षे) याने तलवार काढून ती फिरवली. पोलिसांनी त्याला कह्यात घेतले आहे.
तलवार घेणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
प्लास्टिक वापरणार्यांकडून १ लाखांचा दंड वसूल !
नवी मुंबई – प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी महापालिकेने दिवाळीत केलेल्या कारवाईत १ लाख ६५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये १८३ किलो प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला.
कचराकुंड्यांची अज्ञातांकडून तोडफोड
जळगाव – येथील मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता रहाण्यासाठी महानगरपालिकेने महिन्यापूर्वी लावलेल्या प्लास्टिकच्या कचराकुंड्या अज्ञात समाजकंटकांनी फटाके लावून तोडल्या.
अशा समाजकंटकांना अटक करून कठोर शिक्षा व्हायला हवी !
भिवंडीत साहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की !
ठाणे – भिवंडी येथील कामतघर परिसरात अतिक्रमणावर कारवाई करत असण्याच्या रागातून महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांना ३ जणांनी धक्काबुक्की केली. महानगरपालिकेच्या पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अन्वेषण करत आहेत.
कायदा हातात घेणार्यांना कारागृहातच डांबायला हवे !
आमदार पात्रतेच्या सुनावणीमध्ये सुनील प्रभु यांची साक्ष नोंद
मुंबई – शिवसेनेच्या आमदारांच्या पात्रतेविषयी २२ नोव्हेंबर या दिवशी विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे सुनावणी झाली. शिवसेनेचे अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी पक्षप्रतोद सुनील प्रभु यांची साक्ष घेतली. यामध्ये शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे गेल्यावर ठाकरे गटाच्या पक्षादेशाविषयी जेठमलानी यांनी माहिती घेतली. २१ नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणी सलग सुनावणी होणार आहे.