परभणी – जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाण्यातील हवालदार आणि हेड कॉन्स्टेबल सुट्टीकालीन न्यायालयात ३० मिनिटे विलंबाने पोचले. या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत दोघांना परिसरातील गवत छाटण्याचे काम देण्यात आले. हे दोघे पोलीस रात्रीच्या गस्तीवर होते; पण पहाटे त्यांना संशयास्पद अवस्थेत फिरतांना कह्यात घेण्यात आले. त्यांना सकाळी ११ वाजता न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार होते; पण ते ११.३० वाजता पोचले. त्यामुळे त्यांना वरील शिक्षा देण्यात आली.
संपादकीय भूमिकान्यायालयात वेळेपूर्वी पोचायला हवे, ही शिस्त पोलिसांनाच नसणे लज्जास्पद ! |