सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ढोकेगळी (जिल्‍हा बेळगाव)  येथील ९० वर्षीय सातेरी पाटील (नाना) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

श्री. सातेरी पाटील

बेळगाव – सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ढोकेगळी, (खानापर, जिल्‍हा बेळगाव) येथील श्री. सातेरी पाटील (नाना) (वय ९० वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाल्‍याचे सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी १८ नोव्‍हेंबर या दिवशी ऑनलाईन प्रणालीद्वारे झालेल्‍या सत्‍संगात घोषित केले. येथील सनातनचे साधक श्री. आबासाहेब सावंत (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि भेटवस्‍तू देऊन त्‍यांचा सत्‍कार केला.

श्री. सातेरी पाटील (नाना) (बसलेले) यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची प्रतिमा भेट देतांना श्री. आबासाहेब सावंत

‘आध्‍यात्मिक प्रगती गाठण्‍यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे सांगतांना श्री. सातेरी पाटील (नाना) म्‍हणाले, ‘‘जे काही गुरुदेवांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून सांगितले. ते ते मी आचरणात आणण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याचे फळ मिळाले आहे. कुणाबद्दलही वाईट बोलू नका, खोटे बोलू नका आणि कुणाबद्दल वाईट चिंतू नका. चांगली साधना करून पुढे पुढे जात रहा. प्रगती करा’, ‘मी सर्व साधकांच्‍या पाठीशी आहे’, असे गुरुदेवांनी वेळोवेळी ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून सांगितले आहे. त्‍याप्रमाणे मी वागण्‍याचा प्रयत्न केला. तुम्‍हीही तसेच प्रयत्न करा.’’

विशेष

नानांची आध्‍यात्मिक पातळी घोषित केल्‍यावर साधक नानांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही आम्‍हाला आनंद दिला.’’ त्‍यावर नाना म्‍हणाले, ‘‘मी नाही गुरुदेवांनी आपल्‍या सर्वांना आनंद दिला.’’


श्री. सातेरी पाटील यांच्‍याविषयी त्‍यांचे नातेवाईक आणि साधक यांनी या प्रसंगी सांगितलेली सूत्रे

१. सौ. जिजा पाटील (सातेरी पाटील यांची सून) – नाना हे माझे सासरे असूनही त्‍यांनी कधीही मला सुनेप्रमाणे वागणूक दिली नाही. ते मला नेहमी त्‍यांच्‍या मुलीप्रमाणे वागवतात. नाना मला ‘सेवेला जा’, असे स्‍वतःहून सांगतात. ‘दीपावलीतील रांगोळ्‍या या शास्‍त्राप्रमाणे काढा आणि त्‍या कुणाच्‍या पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्‍या’, असे आवर्जून सांगतात.

२. सौ. पूजा पाटील, साधिका (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) – नाना हे स्‍वतःहून अर्पण देतात आणि किती अर्पण देऊ असे विचारतात. साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ची वर्गणी संपण्‍याच्‍या अगोदर ते ‘वर्गणीचे पैसे घेऊन जा’, असे सांगतात.

३. श्री. बडकू पाटील, साधक – नानांकडून आम्‍हाला वेळेचे महत्त्व कळले. त्‍यांचा स्‍वभाव मनमिळाऊ आहे.


श्री. सातेरी पाटील यांच्‍याविषयी त्‍यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे !

१. श्री. तुकाराम पाटील (मुलगा), ढोकेगळी, (पोस्‍ट – मंतुरगा, तालुका खानापूर, जिल्‍हा बेळगाव)

१ अ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकल्‍यावर श्री. सातेरी पाटील यांचा सेवेसाठी होणारा विरोध थांबणे : ‘वर्ष १९९४ मध्‍ये आमच्‍या गावी सनातन संस्‍थेचे कार्य चालू झाल्‍यावर आम्‍ही सेवेला जाऊ लागलो; पण सेवेला जाण्‍यासाठी नाना (माझे वडील श्री. सातेरी पाटील) आम्‍हाला (मला आणि पत्नीला) विरोध करायचे. त्‍यांना ‘आम्‍ही व्‍यवहारामध्‍ये प्रगती करावी आणि वेळ वाया घालवू नये’, असे वाटत होते. गुरुदेव माणिकवाडी (खानापूर (बेळगाव)) येथे मार्गदर्शनासाठी आले होते. तेव्‍हा गुरुदेवांचे मार्गदर्शन ऐकण्‍यासाठी नानाही तिथे आले होते. प.पू. गुरुदेवांचे दर्शन आणि मार्गदर्शन झाल्‍यावर नानांचा आम्‍हाला सेवेसाठी होणारा विरोध मावळला.

१ आ. साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचण्‍याची असलेली ओढ ! : आम्‍ही आमच्‍या घरी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक चालू केला. तेव्‍हा काही वेळा आमच्‍याकडून अंक वाचायचा राहून जायचा; मात्र नाना अंकाची वाट पहात बसायचे. एखाद्या वेळी अंक वेळेवर मिळाला नाही, तर ते त्‍याविषयी चौकशी करायचे. साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचण्‍यासाठी ते पहाटे ५ वाजताच उठून बसायचे, इतकी त्‍यांना साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक वाचण्‍याची ओढ असायची. ते अजूनही साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक पूर्ण वाचतात.

१ इ. साधकांविषयी असलेली ओढ आणि आपुलकी : सध्‍या नाना रुग्‍णाईत आहेत; पण त्‍यांना ‘गावामध्‍ये सनातनचे साधक आले आहेत’, असे समजल्‍यावर ते त्‍या साधकांना आमच्‍या घरी बोलावण्‍यासाठी आग्रह धरतात.

१ ई. आध्‍यात्मिक उपाय करणे : रामनाथी आश्रम पाहून आल्‍यापासून नाना अत्तर-कापूर यांचे उपाय आणि नामजप करायला लागले अन् बाहेर जातांना विभूती लावूनच बाहेर पडायला लागले.

१ उ. भाव : नाना इतरांशी बोलतांना नेहमी प.पू. गुरुदेव आणि सनातन संस्‍थेचे कार्य यांविषयी पुष्‍कळ आत्‍मीयतेने बोलतात.’

१ ऊ. झालेला पालट : आरंभी नानांचा स्‍वभाव पुष्‍कळ तापट होता; मात्र ते आता पुष्‍कळ शांत झाले आहेत.’

२. संभाजी चव्‍हाण, शेडेगाळी (जिल्‍हा बेळगाव) 

२ अ. प्रेमभाव

१. ‘जेव्‍हा नानांच्‍या घरी सत्‍संग होत असे, तेव्‍हा ते आम्‍हाला, ‘जेवूनच जा’ असा आग्रह करायचे. त्‍यांच्‍या घरी आम्‍ही कितीही वेळ थांबलो, तरी ते कंटाळत नसत. ते आमच्‍याशी साधनेविषयीच बोलत असत.

२. सनातनचा साधक कुठेही भेटला, तरी ते स्‍वतःहून त्‍या साधकाच्‍या जवळ जाऊन त्‍याची आणि अन्‍य साधकांचीही विचारपूस करत असत.

३. आम्‍ही त्‍यांच्‍यापेक्षा वयाने पुष्‍कळ लहान असूनही नानाच स्‍वतःहून आमची प्रेमाने विचारपूस करतात.’

३. सौ. वैशाली पाटील, ढोकेगळी (जि. बेळगाव)

अ. ‘नाना सनातनच्‍या कार्यक्रमांना नेहमीच उपस्‍थित रहात असत.

आ. ते गुरुपौर्णिमेला स्‍वतःहून अर्पण देतात.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १९.१०.२०२३)