दिवाळीत फटाक्‍यांमुळे मुंबईत आगीच्‍या ७९ घटना गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत आगीच्‍या घटनांमध्‍ये वाढ

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – यंदा दिवाळीत फटाक्‍यांमुळे मुंबईत आगीच्‍या ७९ घटना घडल्‍या. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा आगीच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे, असे महापालिकेने सांगितले आहे. लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी मुंबईत आगीच्‍या २७ घटनांची नोंद करण्‍यात आली. जोगेश्‍वरी येथील इमारतीच्‍या १३ व्‍या मजल्‍यावरील सज्‍जात रॉकेट घुसल्‍याने आग लागली.