भारत बनला ४ ट्रिलियन डॉलरची (अनुमाने ३३३ लाख कोटी रुपयांची) अर्थव्यवस्था असलेला देश ! 

नवी देहली – भारत प्रथमच ४ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. १८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी भारताने हा आकडा ओलांडला.

भारतीय नाणेनिधीच्या आकडेवारीवर आधारित जगातील सर्व देशांच्या ‘जीडीपी’ची माहिती प्रसारित करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यांत भारताच्या अर्थव्यवस्थेत ७.८ टक्के इतकीवाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.