नवी मुंबई, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – महापालिकेच्या कोपरखैरणे येथील उद्यानातील झाडाला रात्री दोरीने गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली. शांतीदूत महावीर उद्यानामध्ये ही घटना घडली. सकाळी एका व्यक्तीला मृतदेह दिसताच तिने पोलिसांना कळवले. पवनकुमार असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून तो कोपरखैरणे येथे रहात होता. याच परिसरात दोन छोटी, तर एक मोठे उद्यान आहे. दिवसा सर्व उद्यानांमध्ये दोन सत्रांत सुरक्षारक्षक असतात; मात्र रात्री तिन्ही उद्यानात मिळून एकच सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे. (गस्तीच्या कामात कामचुकारपणा न करता सुरक्षारक्षकांनी सतर्क रहायला हवे ! – संपादक)