केरळमधील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन् यांचे विधान !
थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या कासारगोड येथील काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन् यांनी १७ नोव्हेंबर या दिवशी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी केलेल्या भाषणात ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणताही खटला चालवल्याविना गोळ्या घालून ठार केले पाहिजे’, असे विधान केले. या वेळी त्यांनी नाझींवर चालवण्यात आलेल्या ‘नूर्हमबग (जर्मनीतील एक शहर) मॉडेल’चे समर्थन केले.
सौजन्य सोसाऊथ
खासदार राजमोहन म्हणाले की, दुसर्या महायुद्धानंतर युद्ध गुन्हेगारांना म्हणजे नाझींना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी ‘नूर्हमबग टेस्ट’सारखी गोष्ट होती. त्यानुसार आरोपींना खटला चालवल्याविना गोळ्या झाडून ठार करण्यात येत होते. आता वेळ आली आहे की, याच धर्तीवर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनाही ‘नूर्हमबग’ लागू केला पाहिजे. आता ते युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत.
संपादकीय भूमिका
|