कर्नाटक राज्य सरकार पुरस्कृत कार्यक्रमात बळूर येथील निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामीजी यांचे हिंदुद्रोही विधान !
धारवाड (कर्नाटक) – ‘हिंदु’ शब्द वापरणार्या लिंगायत लोकांना भविष्य नाही. लिंगायतांमध्ये याविषयी असलेला गोंधळ आधी दूर केला पाहिजे. त्यानंतर धर्म हवा असल्यास लिंगायतांनी ‘हिंदु’ हे पद सोडलेच पाहिजे. जैन आणि शीख यांना आता ‘स्वतंत्र धर्म’ म्हणून मान्यता मिळाली आहे. लिंगायत धर्मालाही स्वतंत्र धर्माची मान्यता मिळेल, हा विश्वास असून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळण्याची पात्रतादेखील आहे; म्हणून हिंदुत्वाला चिकटून न रहाता लिंगायतांनी जागरूक होऊन याविषयी जाणून घ्यावे. या संदर्भात चिंतन झाले पाहिजे, असे विधान बळूर येथील निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामीजी यांनी एका कार्यक्रमात केले. येथील चन्नबसवेश्वर नगरातील लिंगायत भवनात अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा, धारवाड जिल्हा महासभेने राज्य सरकार पुरस्कृत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात १२ वीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.
निजगुणानंद स्वामीजी पुढे म्हणाले की, लिंगायतांची सध्याची स्थिती गोंधळाची असून पुढील ४० वर्षांत ती विषम स्थितीला पोचेल; म्हणून आताच लिंगायतांनी जागे होऊन जातीला चिकटून न रहाता स्वतंत्र धर्म म्हणून जोडले गेले पाहिजे. हा अतिशय गंभीर विचार असून लिंगायत धर्माविषयी, तसेच मूळ आशयाविषयी जाणून घेणे अगत्याचे आहे. त्यासाठी अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा यांनी नेतृत्व घेऊन मथाधिशांचे चिंतन-मंथन करवून घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे अगत्याचे झाले आहे.
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळायला हवी !’ – माजी मंत्री बी.आर्. पाटील
माजी मंत्री बी.आर्. पाटील म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाजाची स्थापना वैज्ञानिक पायावर झाली आहे. त्याला धर्म मान्यता मिळायला हवी. समाज आर्थिक अभिवृद्धीसाठी अधिकोष स्थापन करण्याविषयी विचार चालू आहे.
संपादकीय भूमिकाराजकीय लाभासाठी अशा प्रकारची मागणी करणारे हिंदुद्रोही राजकारणी ! |