24 lakh diyas Ayodhya : दीपावलीत अयोध्येतील शरयू नदीच्या ५१ घाटांवर लावण्यात येणार २४ लाख दीप !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही दिवाळीमध्ये येथील शरयू नदी किनार्‍यावरील ५१ घाटांवर दीप लावले जाणार आहेत. यावर्षी २४ लाख दीप लावले जातील. हा एक जागतिक विक्रम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. याखेरीज येथे ‘लेझर शो’च्या माध्यमांतून भगवान श्रीरामांचे चरित्रही दाखवले जाणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतरचा हा सातवा दीपोत्सव आहे.

या दीपोत्सवासाठी २५ सहस्रांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. दीपोत्सवात परदेशी कलाकार रामलीला कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात रशिया, श्रीलंका, सिंगापूर आणि नेपाळ या देशांमधील कलाकार भाग घेणार आहेत. देशातील २१ राज्यांतील रामलीला आणि रामायण परंपरेवर आधारित लोक सादरीकरण करणार आहेत. यासाठी अनुमाने अडीच सहस्र कलाकार अयोध्येत पोचले आहेत.