जोगनभावी कुंड आणि परिसर स्‍वच्‍छ करा ! – आमदार सतेज पाटील यांचे कर्नाटकचे मंत्री एच्.के. पाटील यांना पत्र

यात्रा कालावधीच्‍या अगोदर कुंड आणि परिसर स्‍वच्‍छ करू ! – उपायुक्‍त बेळगाव

आमदार सतेज पाटील

बेळगाव – आमदार सतेज पाटील यांनी पाठवलेल्‍या पत्राची नोंद घेत मंत्री एच्.के. पाटील यांनी तात्‍काळ या संदर्भात कार्यवाही करण्‍याचे आदेश बेळगाव प्रशासनास दिले होते. त्‍यानुसार बेळगावचे उपायुक्‍त नितेश के. पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना पत्र पाठवून यात्रेपूर्वी अधिकचे मनुष्‍यबळ लावून कुंडाची स्‍वच्‍छता केली जाईल, भाविकांना स्‍वच्‍छ पिण्‍याचे पाणी पुरवले जाईल अन् वाहनतळासाठी योग्‍य नियोजन केले जाईल, अशी ग्‍वाही दिली आहे.

कोल्‍हापूर – डिसेंबरच्‍या अखेरीस बेळगाव जिल्‍ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची यात्रा होत आहे. या यात्रेला कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील अडीच लाख भाविक डोंगरावर उपस्‍थित रहाणार आहेत. कोल्‍हापूर जिल्‍हा रेणुका भक्‍त संघटनेने जोगनभावी कुंड आणि परिसर स्‍वच्‍छ करण्‍यात यावा; अन्‍यथा तेथील लिंब नेसण्‍याच्‍या कार्यक्रमावर (धार्मिक विधी) बहिष्‍कार टाकण्‍याची चेतावणी दिली आहे. या संदर्भात कोल्‍हापूर येथील काँग्रसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे संसदीय कामकाजमंत्री एच्.के. पाटील यांना पत्र पाठवून हा परिसर स्‍वच्‍छ करण्‍याची मागणी पत्राद्वारे केली आहे.