मुंबई – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार, ही अफवा आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या काही नेत्यांनी माझी भेट घेतली. त्यांच्या शंकेचे मी निरसन केले आहे. इतर मागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना इतर मागासवर्गीय समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. कुणबी असल्याचे जुने दाखले ज्यांचे आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केली.