लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश पोलिसांच्या ‘आतंकवादविरोधी पथका’ने इस्लामिक स्टेटचा आतंकवादी वाजिउद्दीनला छत्तीसगडमधील दुर्गमधून नुकतीच अटक केली. वाजिउद्दीन हा अलीगढ मुस्लिम विद्यापिठामधील ‘पीएच्डी’चा विद्यार्थी आहे. आतंकवादविरोधी पथकाला वाजिउद्दीनच्या भ्रमणभाषमधून प्रक्षोभक आणि आतंकवादी लिखाण सापडले आहे. सध्या त्याला ‘ट्रान्झिट रिमांड’ वर दुर्गहून लक्ष्मणपुरी येथे आणण्यात आले आहे. येथे त्याला न्यायालयात उपस्थित करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश पोलिसांच्या ‘आतंकवादविरोधी पथका’ ने अलीगढ मुस्लिम विद्यापिठाशी संबंधित अब्दुल्ला अर्शलान आणि माज बिन तारिक या दोघांना अटक केली होती. ते दोघेही इस्लामिक स्टेटच्या विचारसरणीने प्रेरित होते. वाजिउद्दीन, अब्दुल्ला अर्शलान आणि माज बिन तारिक हे आतंकवादी पुणे इस्लामिक स्टेटच्या टोळीशी जोडलेले आहेत.
अब्दुल्ला आणि शाहजवाज यांच्या पत्नी आहेत हिंदु
गेल्या २ मासांत अलीगढ मुस्लिम विद्यापिठातून पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी हिंदु मुलींशी लग्न केले होते. ऑक्टोबर मासामध्ये देहली पोलिसांनी पकडलेला आतंकवादी शाहनवाजने २०२१ मध्ये एका हिंदु मुलीशी लग्न केले होते. आतंकवादी अब्दुल्ला अर्शलान यानेही हिंदु मुलीशी लग्न केले आहे.