साधकांनो, ‘आरोग्‍यपूर्ण दीर्घायुष्‍य प्राप्‍त व्‍हावे’, यासाठी आपण साक्षात् धन्‍वन्‍तरिदेवतेला आळवूया !

उद्या १० नोव्‍हेंबरला असलेल्‍या धन्‍वन्‍तरि जयंतीच्‍या निमित्ताने…

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘आयुर्वेदाचे प्रवर्तक आणि वैद्यांची देवता धन्‍वन्‍तरि याची उत्‍पत्ती ज्‍या दिवशी झाली, तो दिवस म्‍हणजे ‘धनत्रयोदशी’ ! हा दिवस ‘धन्‍वन्‍तरि जयंती’ म्‍हणून साजरा केला जातो.

देवतांचे वैद्य असलेली धन्‍वन्‍तरिदेवता, म्‍हणजे आरोग्‍य देणारी देवता ! आपला देह जर दुर्बल आणि रोगांनी ग्रासलेला असेल, तर आपल्‍याला साधना कशी करता येईल ? म्‍हणून ईश्‍वरप्राप्‍तीच्‍या इच्‍छापूर्तीसाठी आपला देह निरोगी ठेवून आरोग्‍यरूपी धनसंपदा प्रदान करण्‍यासाठी साक्षात् धन्‍वन्‍तरिदेवता आपल्‍यावर अमृतवर्षाव करणार आहे.‘साधनेसाठी देहमर्यादा ओलांडून देहाला साधनेत झोकून देता यावे’, यासाठी आरोग्‍यपूर्ण दीर्घायुष्‍य प्रदान करण्‍यासाठी आपण साक्षात् धन्‍वन्‍तरिदेवतेला आळवूया !’

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (८.११.२०२३)