मुंबईतील नौदल अधिकार्‍याला फसवून अडीच लाख रुपयांची खंडणी उकळली !

नौदल अधिकार्‍याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत सिद्ध केली

मुंबई – नौदल अधिकार्‍याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत सिद्ध करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कफ परेड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने केंद्रीय अन्वेषण विभागातील (‘सीबीआय’तील) अधिकारी असल्याचे सांगून नौदल अधिकार्‍याला धमकावले होते.

१. ५१ वर्षीय तक्रारदार भारतीय नौदलात अधिकारी असून ते कुलाबा नेव्ही नगर परिसरात रहातात. त्यांची फेसबुकवर अनोळखी महिलेशी ओळख झाली. कालांतराने तिने या अधिकार्‍यास व्हिडिओद्वारे संपर्क केला. या वेळी ती अश्‍लील चाळे करत होती.

२. आरोपी महिलेने तक्रारदाराची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत सिद्ध करून ती यूट्युबवर प्रसारित करण्याची धमकी दिली. तिने नौदल अधिकार्‍याकडून आतापर्यंत २ लाख ५० सहस्र ४९९ रुपये घेतले आहेत.

संपादकीय भूमिका

संरक्षण दलातील अधिकारी अशा फसवणुकीची शिकार होणे हे संरक्षण दलासाठी लज्जास्पदच होय ! आतापर्यंत अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या असतांना संरक्षण दलाने यासंदर्भात सतर्कता बाळगायला हवी !