श्री गणपतीची स्तुती करणे, ही अंधश्रद्धा असल्याचे पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांचे हिंदुद्वेषी विधान !

पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी

चित्रदुर्ग (कर्नाटक) – श्री गणपतीची स्तुती करणे, ही अंधश्रद्धा आहे. बसवण्णा (लिंगायत समाजाचे संस्थापक) यांचे वचन प्रस्तुत करणे, ही खरी प्रार्थना आहे. (लिंगायत पंथ हा हिंदु धर्माचा एक भाग आहे; मात्र शिवाचार्य यांच्यासारखे कथित स्वामी हिंदूंच्या देवतांना अंधश्रद्धा संबोधून लिंगायत पंथियांना हिंदु धर्मापासून लांब नेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक) कार्यक्रमाच्या आरंभी त्यांची वचने गाऊ शकतो, असे विधान पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांनी येथे राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटन समारंभात शिव ध्वजारोहण केल्यानंतर केले.

स्वामी म्हणाले की, श्री गणपति काल्पनिक देवता आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या निमित्ताने जन्मलेला हा देव आहे. बाह्य वस्तूंनी निर्मिलेला देव, हा देव नाही. घरी अथवा कोणत्याही समारंभात आधी श्री गणपति पूजा, स्तोत्र आणि श्‍लोक पठण करावे, अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्याऐवजी बसवण्णांच्या वचनांचे प्रार्थना म्हणून पठण करावे. (प्रत्येक जण स्वतःच्या श्रद्धेनुसार देवावर भाव ठेवतो आणि पूजा, अर्चना करतो. ते न करता ‘मी’ सांगतो, तेच करा, असा आग्रह म्हणजे अहंकार होय ! – संपादक) स्वसामर्थ्य, उत्तम चालीरीती, वागणूक असणारेच खरे देव आहेत. स्वतःवर आपला विश्‍वास हवा.

संपादकीय भूमिका

सवंग लोकप्रियतेसाठीच अशी विधाने तथाकथित स्वामी करत असतात, त्यातलेच हे एक उदाहरण ! अशांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी !