रत्नागिरी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उधना (गुजरात) ते मंगळुरू (कर्नाटक) अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी ३ नोव्हेंबर २०२३ पासून धावणार आहे. आठवड्यातून २ दिवस ही गाडी १ जानेवारी २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे.
०९०५७/ ०९०५८ या गाडीच्या उधना ते मंगळूर दरम्यान फेर्या दि. ३, ५, १०, १२, १७, १९, २४,२६ नोव्हेंबर, तसेच डिसेंबर महिन्यातही दि. ३१ डिसेंबरपर्यंत आठवड्यातून २ दिवस ही गाडी धावणार आहे.
मंगळुरू ते उधना या मार्गावर ४ नोव्हेंबरपासून या गाडीच्या फेर्या चालू होणार आहेत. ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कानाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबे घेणार आहे.