मुंबई येथील काळी-पिवळी टॅक्सी आजपासून बंद होणार !

६ दशके सेवा दिली, संग्रहालयात जतन करण्याची मागणी !

मुंबई – गेल्या ६ दशकांपासून मुंबईची ओळख असलेली ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी ३० ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. ही टॅक्सी सेवा ‘काली-पिली’ म्हणून प्रसिद्ध होती. एका उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले की, शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी’ ही २९ ऑक्टोबर २००३ या दिवशी ताडदेव उपप्रादेशिक परिवहन येथे ‘काळी-पिवळी’ टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्याची मर्यादा २० वर्षे आहे. ‘कॅब’ २० वर्षांपर्यंत टिकू शकते. रस्त्यावर किंवा संग्रहालयात किमान १ ‘प्रीमियर पद्मिनी’ जतन करण्यात यावी, अशी मागणी काहींनी केली आहे.