भूमी बळकावल्याच्या प्रकरणी आयोगाकडून अन्वेषण पूर्ण

पुढील ३-४ दिवसांत अहवाल देणार


पणजी, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यातील भूमी बळकावल्याच्या प्रकरणी शासनाने नेमलेले निवृत्त न्यायाधीश एस्.के. जाधव यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने अन्वेषण पूर्ण केले आहे. हा आयोग पुढील ३-४ दिवसांत सरकारला अहवाल सुपुर्द करण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार आयोगाने भूमी बळकावल्याच्या प्रकरणी सुमारे ५० प्रकरणांचे अन्वेषण केले आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी अन्वेषण करणे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे यांसाठी सरकारला आवश्यक सूचना करणे, असे दायित्व आयोगाला देण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

अन्वेषण पूर्ण झाल्याने आता संबंधितांना शिक्षा होण्यासाठीची पावलेही त्वरित उचलली, तरच फसवणूक झालेल्यांना न्याय मिळाला, असे होईल.