सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याशी एकरूप झालेले सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे !

‘काही वर्षांपूर्वी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचे कोल्‍हापूर येथे अधूनमधून मार्गदर्शन असायचे. त्‍यांचे मार्गदर्शन किंवा कोणतेही शिबिर असेल, त्‍या वेळी त्‍यांचे पूर्वनियोजन आणि व्‍यासपिठावरील व्‍यवस्‍था इत्‍यादी सेवा मला मिळाल्‍यामुळे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचे दर्शन अन् त्‍यांची चैतन्‍यमय वाणी यांचा लाभ मिळायचा. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत. 

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी वापरलेल्‍या वस्‍तूंतून आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होणे

मार्गदर्शन किंवा शिबिर यांसारख्‍या कार्यक्रमांमध्‍ये सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांंच्‍यासाठी संतकक्ष सिद्ध करण्‍याची सेवाही माझ्‍याकडे असायची. तेथे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी वापरलेल्‍या वस्‍तूंचा नंतर मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपायांसाठी पुष्‍कळ लाभ व्‍हायचा. त्‍यांनी किमान ९ – १० वर्षांपूर्वी वापरलेली उशी अजूनही आम्‍ही आध्‍यात्मिक उपायांसाठी जपून ठेवली आहे.

सौ. श्रुति पाचखेडे

२. सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे बोलत असतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा आवाज ऐकू येईल, इतकी त्‍यांची गुरुदेवांशी एकरूपता असल्‍याचे जाणवणे

प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे बरीच वर्षे त्‍यांचे कोल्‍हापूरला येणे झाले नव्‍हते. माझे लग्‍न झाल्‍यानंतर मला त्‍यांचे दर्शन झाले नाही. त्‍याआधी ते आले होते. तेव्‍हाच्‍या बर्‍याच मार्गदर्शनांमध्‍ये ते बोलत असायचे; मात्र मला आवाज प.पू. डॉ. आठवले यांचा ऐकू यायचा. त्‍या कालावधीत मी कधीच सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांचा प्रत्‍यक्ष आवाज ऐकला नाही. मला केवळ प.पू. डॉक्‍टरांचाच आवाज ऐकू यायचा. डोळे बंद असोत वा प्रत्‍यक्ष डोळ्‍यांनी पहात असो, मला अशीच अनुभूती यायची. माझ्‍या डोळ्‍यांना सद़्‍गुरु राजेंद्रदादा दिसायचे आणि मला वाणी प.पू. डॉक्‍टरांची जाणवायची. तेव्‍हा मला जाणवायचे, ‘सद़्‍गुरु दादांची परात्‍पर गुरुदेवांवरती इतकी श्रद्धा आहे की, ‘स्‍वतःच्‍या माध्‍यमातून गुरुदेवच साधकांना मार्गदर्शन करत आहेत’, असा त्‍यांचा भाव असल्‍यामुळे ते प.पू. डॉक्‍टरांशी एकरूप झाले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यातून प.पू. डॉक्‍टरांच्‍या चैतन्‍यमय आणि प्रीतीमय वाणीची अनुभूती येत होती.’

– सौ. श्रुति पाचखेडे, अमरावती. (१८.९.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक