कोलकाता (बंगाल) – रेशनिंग घोटाळ्याच्या प्रकरणी बंगालचे वनमंत्री श्री. ज्योतिप्रिया मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) उत्तररात्री साडेतीन वाजता त्यांच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली. याआधी ‘ईडी’कडून मलिक यांची २० घंटे चौकशी करण्यात आली होती. वनमंत्रीपदाच्या आधी मलिक यांच्याकडे अन्न पुरवठा मंत्रालयाचा पदभार होता. मलिक यांचे व्यावसायिक बकिबुर रेहमान यांच्याशीही संबंध होते का ? याचे अन्वेषण ‘ईडी’ करत आहे. रेहमान यांना नुकतीच या घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देतांना ज्योतिप्रिया मलिक यांनी ‘हा मोठा कट आहे’ असा आरोप केला आहे.
सौजन्य इंडिया टूडे