खरी ओळख लपवून विवाह केल्यास किंवा शारीरिक संबंध ठेवल्यास  १० वर्षांची होणार शिक्षा !

केंद्रशासन करणार नवीन कायदा !

नवी देहली – आपली खरी ओळख लपवून एखाद्या महिलेसमवेत लग्न करणे अथवा तिच्या समवेत शारीरिक संबंध ठेवणे आता गुन्हा ठरणार आहे. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ६९ नुसार असे करणे छळ मानले जाणार असून त्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा केली जाणार आहे. या संदर्भात कायदेविषयक संसदीय समितीने एक अहवाल बनवला असून विधेयकही आणले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असे केले, तर तो बलात्कार मानला जाणार नाही, तर छळ मानला जाणार आहे.

रोजगार देणे, बढती देण्याचे अथवा विवाहाचे आश्‍वासन देऊन लग्न करणे हासुद्धा छळ मानला जाणार आहे. गेल्या काही वर्षांत देशात अशा अनेक घटना घडल्याचे उघड झाले होते. अशा प्रकरणांच्या संदर्भात पोलिसांनाही कारवाई करतांना कठीण जात होते. आता यासंदर्भात कायदा झाल्यानंतर कारवाई करणे सोपे होणार आहे.