आपण हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या आंदोलनाला आपले ‘स्व-रूप’ देऊया, म्हणजेच या आंदोलनाला आपण आपल्या आत्म्याचे, साधनेचे बळ देऊया. हे आंदोलन, म्हणजे केवळ आपला धर्म आहे असे न मानता; हे आमचे आणि आमच्या आत्म्याचे कर्तव्य आहे, असे आपण मानूया. हे आंदोलन प्रत्येक व्यक्तीपर्यंत लवकरात लवकर पोचवणे, हे आपल्या आत्म्याचे कर्तव्य आहे. चंद्रगुप्ताचे गुरु चाणक्य म्हणत, ‘अधिक वेळ लावला, तर विजयी होऊ शकणार नाही.’ त्यामुळे मला वाटते की, आपण हारण्याच्या पुष्कळ पुढे पोचलो आहोत, आता हरणे आमच्याजवळ येऊ शकत नाही. आपल्या हातात विजय आहे. या विजयाचा लाभ करून घेण्यासाठी आपण सर्व सिद्ध होऊया आणि एकजूट होऊन शंखनाद करूया !
– श्री. महेश योगी, हिंदुत्वनिष्ठ