इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात नागरिकांचा मृत्यू होणे चिंतेची गोष्ट !

संयुक्त राष्ट्रांत भारताचे विधान !

संयुक्त राष्ट्रा संघातील भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धात नागरिकांचा मृत्यू होणे ही चिंतेची गोष्ट आहे. सर्व पक्षांनी नागरिक आणि विशेषकरून महिला आणि मुले यांचे संरक्षण केले पाहिजे. मानवतावादी समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केले. भारताने गाझा पट्टीतील नागरिकांसाठी ३८ टन जीवनोपयोगी साहित्य पाठवले असल्याची माहितीही भारताने या परिषदेत दिली.

संयुक्त राष्ट्रा संघातील भारताचे प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी म्हटले की, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याकरता भारताचे समर्थन आहे. या दोन्ही देशांतील परिस्थिती सामान्य व्हावी, याकरता आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना पाठिंबा असून दोन्ही देशांच्या समस्यांच्या निराकरणासाठी भारत वचनबद्ध आहे.