१. स्वभावदोषांची व्याप्ती काढायचा कंटाळा येणे
‘२३.९.२०२२ या दिवशी आम्ही (मी आणि माझे यजमान श्री. शेखर आगरवाडेकर) स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो. आम्हाला स्वभावदोषांची व्याप्ती काढायला सांगितली. (स्वतःत कोणते स्वभावदोष आहेत आणि ते कुठे उफाळून येतात, याची सूची करणे) आम्हाला स्वभावदोषांची व्याप्ती काढायचा कंटाळा येत होता.
२. यज्ञस्थळी बसून नामजपादी उपाय केल्यावर स्वभावदोषांची व्याप्ती काढता येणे
२६.९.२०२२ या दिवसापासून आश्रमात नवरात्रीनिमित्त यज्ञयाग चालू झाले. आम्ही यज्ञस्थळी बसून नामजपादी उपाय केले. त्या दिवसापासून आम्हाला स्वभावदोषांची व्याप्ती गतीने काढता आली. यज्ञस्थळी बसून नामजपादी उपाय करण्याचे महत्त्व लक्षात येऊन माझा उत्साह वाढला. ‘यज्ञाच्या माध्यमातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य मिळते’, असे आमच्या लक्षात आले.
३. भक्तीसत्संगात सांगितल्याप्रमाणे देवीतत्त्व अनुभवता येणे आणि सनातनच्या तिन्ही गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) हृदयात वसवणे
भक्तीसत्संगात देवीतत्त्व अनुभवायला सांगितले होते. यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याबद्दलचा माझा भक्तीभावही वाढला. माझ्या मनात त्यांच्याविषयी विचार येत असत. माझे त्यांच्या चरणी शरण जाण्यासाठी प्रयत्न होत असत. त्यांच्या स्थूल रूपापेक्षा त्यांच्या निर्गुण रूपाला शरण जाण्याचा माझा भाग वाढला. सनातनच्या तिन्ही गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना) मी हृदयात वसवले.
४. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यज्ञाविषयी माहिती देत होते. माझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे ते सांगत असलेल्या माहितीतून मला मिळत होती.
हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल श्रीगुरुचरणी कृतज्ञता !’
– सौ. शर्वाणी शेखर आगरवाडेकर, म्हापसा, गोवा. (९.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |