१. ‘डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्याकडे पहातांना त्या श्री महालक्ष्मीच्या रूपात दिसणे आणि साधिकेचे सूक्ष्म रूप त्यांच्यासाठी ‘कमळाच्या फुलांच्या पायघड्या घालत आहे’, असे दृश्य तिला दिसणे
‘१२.९.२०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी व्यष्टी लिखाण करण्यासाठी तिसर्या माळ्यावर बसले होते. त्या वेळी कु. रूपाली कुलकर्णी तिथे डॉ.(सौ.) कुंदा जयंत आठवले (सौ. कुंदाताई) यांना फिरण्यासाठी घेऊन आली होती. सौ. कुंदाताई फिरत असतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता. थोड्या वेळाने सौ. कुंदाताई मला श्री महालक्ष्मीच्या रूपात सुंदर दिसू लागल्या आणि ‘माझे सूक्ष्म रूप त्यांच्यासाठी कमळफुलांच्या पायघड्या घालत आहे’, असे दृश्य मला १० मिनिटे दिसत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू वहात होते. माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले होते. ‘गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला हे अनुभवता येत आहे’, असे मला वाटले.
२. ‘डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांना नमस्कार करावा’, असे वाटणे आणि त्यांनी ‘तुमच्या अंतःकरणातील तुमचा नमस्कार मला पोचला’, असे सांगितल्यावर भावस्थिती अनुभवून हलके वाटणे
थोड्या वेळाने माझ्या मनात विचार आला, ‘मी त्यांना (सौ. कुंदाताईंना) नमस्कार केला, तर त्यांना चालेल का ?’ त्याविषयी मी रूपालीताईला विचारले. तेव्हा सौ. कुंदाताई मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या अंतःकरणातील तुमचा नमस्कार मला पोचला.’’ तेव्हा माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रू वहात होते. मला वेगळीच स्थिती अनुभवता येत होती. नंतर मला हलके आणि शांत वाटत होते.
गुरुमाऊलींच्या कृपेने मला हे अनुभवता आले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. संगीता चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०२३)
|