१. पहिल्याच प्रयत्नात साधकाला योग्य छायाचित्र काढता आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आनंद होऊन त्यांनी त्याचे कौतुक करणे
काही दिवसांपूर्वी सद्गुरु गाडगीळकाका परात्पर गुरु डॉक्टरांची प्रतिदिन दृष्ट काढत होते. संशोधनाच्या दृष्टीने दृष्ट काढण्यापूर्वी आणि काढल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर अन् सद्गुरु गाडगीळकाका यांची छायाचित्रे काढायची होती. आरंभीचे काही दिवस मी काढलेली छायाचित्रे चुकत असल्याने दुसर्या किंवा तिसर्या वेळी काढलेले छायाचित्र अंतिम होत असे. एक दिवस परात्पर गुरु डॉक्टरांचे मी काढलेले पहिलेच छायाचित्र योग्य आल्यावर ते म्हणाले, ‘‘आज तू पहिल्याच प्रयत्नात पास झालास. शाब्बास ! तू पहिल्या प्रयत्नात पास झालास की, मला अधिक आनंद होतो.’’
२. गरबा नृत्याचे सादरीकरण पहातांना गुरुदेवांना आनंद मिळून त्यांनी ‘तुम्हा साधकांची प्रगती’ हाच माझा आनंद आहे’, असे सांगणे
‘गरबा’ नृत्याचे सादरीकरण बघून झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मला आज पुष्कळ आनंद मिळाला.’’ त्यावर मी म्हणालो, ‘परम पूज्य, असा आनंद आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. चित्रीकरण आणि छायाचित्रे यांमध्ये पुष्कळ चुका होत आहेत.’ त्यावर ते म्हणाले, ‘‘असा विचार नको करूस. ‘तुम्हा साधकांची प्रगती’ हाच माझा आनंद आहे.’’
– श्री. केदार नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२०)