
सातारा, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – संपूर्ण देशाला सार्थ अभिमान वाटेल, असे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टपैलू गुणांची प्रचीती येईल, तसेच देश-विदेशांतील पर्यटकही आकर्षित होतील. मर्यादित वेळेत उभारण्यात येणार्या या स्मारकात छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मूर्ती आणि विविध शिल्पाकृती उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
खासदार उदयनराजे भोसले या वेळी म्हणाले की, स्मारकाचे आराखडे, संकल्पचित्रे याविषयी सातारा नगर परिषदेने निविदा मागवाव्यात, तसेच अन्य स्पर्धात्मक किंवा प्रोत्साहनात्मक उपक्रम राबवावेत. स्मारक आणि सभोवतालच्या परिसराविषयी नागरिकांनी विशेषतः इतिहासतज्ञांनी योग्य त्या सूचना कराव्यात.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !