तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे आतापर्यंत जवळपास ५ सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीत आतापर्यंत ३ सहस्र ५००, तर इस्रायलमध्ये १ सहस्र ४०० लोक मारले गेले आहेत. अशातच एक व्हिडिओ समोर आला असून ‘७ ऑक्टोबर या दिवशी हमासकडून इस्रायलवर डागण्यात आलेल्या ५ सहस्र रॉकेट्समध्ये उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करण्यात आला आहे’, असा दावा करण्यात आला आहे. अन्य एका व्हिडिओतूनही सांगण्यात आले आहे की, इस्रायलने कह्यात घेतलेली हमासची शस्त्रास्त्रे ही उत्तर कोरियात बनवण्यात आली आहेत. यामुळे उत्तर कोरिया जरी हमासला शस्त्रे विकत असल्याचे नाकारत असला, तरी त्यात तथ्य नाही.
सौजन्य मिरर नाऊ
‘कंसल्टन्सी आर्मामेंट रिसर्च सर्विसेस’ या आस्थापनाचे संचालक आणि शस्त्रास्त्रे विशेषज्ञ एन्.आर्. जेनजेन-जोन्स म्हणाले की, इस्रायलवर डागण्यात आलेल्या एफ्-७ रॉकेट्सचा उपयोग सीरिया, इराक, लेबनॉन आणि गाझा पट्टी येथील लढायांच्या वेळी करण्यात आला होता. उत्तर कोरिया पुष्कळ काळापासून पॅलेस्टिनी आतंकवादी समूहांचे समर्थन करत आला आहे.