१. यज्ञकुंडात कालिकामातेचे दर्शन होऊन यागाच्या यजमानांनी दिलेली कण्हेरीच्या पुष्पांची आहुती देवीने स्वीकारून आशीर्वाद देणे
‘९.१०.२०२१ या दिवशी यागाचे यजमान हवनात कण्हेरीच्या फुलांची आहुती देत होते. त्या वेळी मला यज्ञकुंडात श्री कालिकामाता दिसत होती. कालिकामाता त्यांच्याकडे पाहून हसत होती. आहुती देत असतांना ती पुष्पे देवीच्या चरणांवर पडत होती. काही वेळा आहुती घालण्यापूर्वीच देवी आपले मुख उघडून ठेवायची आणि पुष्प ग्रहण करायची. मधेमधे देवी यजमानांकडे मस्तक झुकवून पुष्पे डोक्यावर अर्पण करून घेत होती आणि त्यांना आशीर्वाद देत होती. शेवटी सर्व पुष्पे देवीच्या अंगावर पडत होती. हे पहात असतांना मला थंडावा जाणवून अंगावर रोमांच आले.
२. यागाच्या यजमानांनी हवनात डाळिंबाच्या दाण्यांची दिलेली आहुती देवीने ग्रहण करणे
नंतर यागाच्या यजमानांनी डाळिंबाच्या दाण्यांची आहुती दिली. तेव्हा देवीने ते दाणे दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतले आणि ग्रहण केले. तिचे मुख मधेमधे उघडे असायचे आणि ‘देवी तो प्रसाद यजमानांच्या हातातून ग्रहण करत आहे’, असे मला जाणवले.
मला तिन्ही गुरूंमुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे) कालिकामातेचे दर्शन झाले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१२.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |