सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेने अनुभवलेला भावानंद !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. श्यामल करंगुटकर

 १. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जायचे आहे आणि तेथे गेल्यावर गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, असे समजल्यावर माझा आनंद गगनात मावत नव्हता.

२. श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) यांनी सूर्यदेवाला प्रार्थना केली, ‘हे सूर्यदेवते, तुझा दाह न्यून करून आमच्यावर कृपादृष्टी ठेव.’ त्यानंतर उन्हाचा दाह अल्प होऊन आकाशात मळभ आले आणि गार वारे वाहू लागले. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले. ‘गुरुदेव किती थोर आहेत !’, याची मला जाणीव झाली.

३. आकाशातून ‘गुरुदेवांच्या स्वागतासाठी देवता आणि ऋषिमुनी आले आहेत’, असे मला जाणवले. मी तो सोहळा पाहून धन्य धन्य झाले. माझी सतत भावजागृती होत होती.

‘गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे मला हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. श्यामल मिलिंद करंगुटकर (वय ६४ वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (१८.५.२०२३)