गोहत्येसह ३४ गुन्ह्यांमध्ये सहभाग
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे बुरखा घालून पळतांना समाजवादी पक्षाचा नेता महंमद मुझफ्फर याला अटक करण्यात आली. महंमद मुझफ्फर याच्यावर विविध विविध जिल्ह्यांमध्ये गोहत्येसह ३४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुझफ्फर अटक टाळण्यासाठी बुरखा घालून पळून जात होता; मात्र पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याला अटक केली. (गुन्हेगारांचा भरणा असलेल्या समाजवादी पक्षावर बंदी घालणेच योग्य ठरेल ! – संपादक)
१. मुझफ्फर एका लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ‘पोलीस अटक करणार’, अशी माहिती मिळताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी मुझफ्फर याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
२. मुझफ्फर याच्या विरोधात प्रयागराज, चंदौली, वाराणसी, भदोही आशि कोशांबी इत्यादी जिल्ह्यांमध्ये ३४ गुन्हे प्रविष्ट आहेत. प्रशासनाला मुझफ्फर याच्या अनेक बेहिशोबी संपत्तीचाही शोध लागला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुझफ्फर याची १० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.