उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’ची दोन प्रकरणे उजेडात !
आगरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील २ वेगवेगळ्या जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे समोर आली आहेत. फिरोजाबाद येथे साजिद कुरेशी याच्यावर घटस्फोटित हिंदु महिलेेचे धर्मांतर करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी साजिद याला अटक करून कारागृहात पाठवले आहे. दुसरे प्रकरण आगरा येथील आहे. येथील साहिल नावाच्या मुसलमान तरुणावर एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून कह्यात ठेवल्याचा आरोप आहे. हिंदु संघटनांचे सदस्य साहिल याच्या घरी पोचले, तेव्हा त्याने अल्पवयीन मुलगी त्याची पत्नी असल्याचे खोटेच सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र सत्य समोर येताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. बजरंग दलाच्या सदस्यांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.