वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवावे ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी ‘गगनयान मोहिमे’च्या समीक्षण बैठकीत वैज्ञानिकांना केले आवाहन !

नवी देहली – भारतीय वैज्ञानिकांनी वर्ष २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. तसेच वर्ष २०३५ पर्यंत पहिले ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळ केंद्र) स्थापित करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे, असे ध्येय पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना दिले. ते अंतराळात मानव पाठवण्याच्या भारताच्या गगनयान मोहिमेच्या समीक्षण बैठकीत बोलत होते. या वेळी पंतप्रधानांनी ‘वीनस ऑर्बिटर मिशन’ (शुक्र ग्रहाभोवती यान पाठवण्याची मोहीम) आणि ‘मंगल लँडर’ (मंगळ ग्रहावर यान उतरवण्याची मोहीम) यांच्यावरही काम करण्याविषयी वैज्ञानिकांना सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गगनयान मोहिमेच्या अंतर्गत विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला.

सौजन्य एएनआय न्यूज