पाकमध्ये मला जे सहन करावे लागले, ते मलाच ठाऊक ! – लक्ष्मण शिवरामकृष्णन्, माजी क्रिकेटपटू

माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन् यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवरून प्रश्‍न उपस्थित करणारे पत्रकार राजदीप सरदेसाई यांना फटकारले !

डावीकडून शिवरामकृष्णन् आणि राजदीप सरदेसाई

नवी देहली – कर्णावती येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये १४ ऑक्टोबर या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना पार पडला. यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्याविषयी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट करत, ‘हे योग्य आहे का? श्रीरामाचा उल्लेख सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असावा, शत्रुत्व नव्हे’, असे लिहिले होते. (इतर वेळी हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि संस्कृती यांच्यावर टीका करणार्‍या पुरो(अधो)गामी पत्रकारांना पाकची तळी उचलतांना श्रीराम आठवतो, हे जाणा ! – संपादक) यावर भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन् यांनी कठोर शब्दांत टिप्पणी केली आहे. शिवरामकृष्णन् यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्येे, ‘मी १६ वर्षांचा (वर्ष १९८३ मध्ये) किशोरवयीन असतांना त्या काळी पाकिस्तानमध्ये मला ज्या पद्धतीच्या हेटाळणीचा सामना करावा लागला, ते माझे मलाच ठाऊक. माझा रंग, माझा धर्म, माझा देश आणि माझी संस्कृती यांवरून माझी हेटाळणी झाली. शिवीगाळ झाली. त्यामुळे जर तुम्हाला असा कुठला अनुभव आला नसेल, तर कृपा करून या गोष्टींवर बोलू नका’ अशा शब्दांत राजदीप सरदेसाई यांना फटकारले आहे.

संपादकीय भूमिका 

ढोंगी निधर्मी पत्रकारांनी नेहमीच पाकची तळी उचलली आहे. त्यांमुळे त्यांची शेपूट नेहमी वाकडीच रहाणार, यात शंका नाही !