‘तिरुपती येथील बालाजीला लाडवांचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर भक्तांना प्रसादाचा लाडू दिला जातो. आम्ही तिरुपती येथून प्रसादाचे लाडू आणले होते. दुसर्या दिवशी आम्ही आमच्याकडे दूध द्यायला येणार्या काकांना तो प्रसाद दिला. तेवढ्यात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंनी सांगितले, ‘‘तुमच्याकडील गायींनासुद्धा श्री बालाजीचा प्रसाद द्या.’’ तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंच्या संपर्कात येणार्या प्रत्येकावर त्या सारखेच प्रेम करतात’, हे आमच्या लक्षात आले. या वेळी मला ‘संत एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेले पवित्र गंगाजल एका तहानलेल्या गाढवाला दिले’, या प्रसंगाची आठवण झाली.’
– श्री. विनीत देसाई, चेन्नई (९.५.२०२२)