‘आश्रम परिसरातील बांधकामाचा मातीचा ढिगारा स्वच्छ असावा आणि त्यातील रज-तम दूर होऊन त्यातून सात्त्विक स्पंदनांची निर्मिती व्हावी’, यांकडे कटाक्ष असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्री. राम होनप

‘वर्ष २००५ मध्ये  रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाचे बांधकाम चालू होते. त्या वेळी मी बांधकामाशी संबंधित सेवेत होतो. त्या वर्षी परात्पर गुरु डॉक्टर प्रतिदिन नूतन बांधकामाची पहाणी करण्यासाठी आश्रम परिसरात एक फेरी घ्यायचे. एकदा त्यांना आश्रम परिसरात मातीचा एक मोठा ढिगारा दिसला. त्यात कागदाचे तुकडे, सिमेंटच्या प्लास्टिकच्या गोण्या, छोटी-मोठी लाकडे इत्यादी कचरा होता. ते पाहून रज-तम जाणवत असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी एका साधकाला तो मातीचा ढिगारा लवकर स्वच्छ करण्यास सांगितला. त्याने ही सेवा मला लवकर पूर्ण करण्यास सांगितली. मातीच्या ढिगार्‍यावर चढून मी तो स्वच्छ केला. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘बांधकामाच्या इतक्या सेवा प्रलंबित असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मातीचा ढिगारा स्वच्छ करण्यास का सांगितले ?’ त्यानंतर ही सेवा २ – ३ घंटे देऊन पूर्ण झाली. मी त्या मातीच्या स्वच्छ ढिगार्‍याकडे पाहिले असता त्यातून सात्त्विक स्पंदने येऊ लागली आणि त्याकडे ‘पहात रहावे’, असे मला वाटू लागले. तेव्हा या सेवेचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

दुसर्‍या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी बांधकामाची पहाणी करतांना तो मातीचा स्वच्छ झालेला ढिगारा पाहिला आणि साधकाला आनंदाने म्हणाले, ‘‘आता छान झाले !’’

या प्रसंगी माझ्या मनात विचार आला, ‘सर्वसाधारणपणे कुणीही आश्रम नीटनेटका, स्वच्छ आणि सुंदर असावा’, यांचा विचार करेल; परंतु आश्रम परिसरातील मातीचा ढिगाराही स्वच्छ असावा’, हा परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार वैशिष्ट्यपूर्ण आहे.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.५.२०२३)