पोलिसांकडून सखोल चौकशी चालू !
लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – येथील पोलीस शिपाई सुहेल अंसारी याने फेसबुक पोस्टद्वारे पॅलेस्टाईनसाठी देणगी मागितली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे. पोलिसांनी अंसारीची चौकशी केली असता त्याने मुलाकडून ही चूक झाल्याचे सांगत ही पोस्ट हटवली. पोलीस अंसारीच्या उत्तरावर समाधानी नसून त्यांनी सखोल चौकशीस प्रारंभ केला आहे.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशच नाही, तर देशातील प्रत्येक राज्यांतील पोलीस दलामध्ये अशा मानसिकतेच्या पोलिसांना शोधून काढून त्यांना नोकरीतून काढून टाकणे, तसेच त्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे ! |