उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. शिवांश सूरज सूर्यवंशी हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. शिवांश सूरज सूर्यवंशी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (५.१०.२०२३) |
(‘शिवांश’ या शब्दाचा अर्थ ‘शिवाचा अंश’, असा आहे.)
भाद्रपद कृष्ण द्वादशी (११.१०.२०२३) या दिवशी कु. शिवांश सूरज सूर्यवंशी याचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. शिवांश सूरज सूर्यवंशी याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वय ३ वर्षे
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव : ‘शिवांश ३ वर्षांचा असतांना एकदा माझ्या बाजूला खेळत होता. खेळतांना त्याच्या डोक्याला कपाट लागले. मी त्याला त्याविषयी विचारल्यावर तो मला म्हणाला, ‘‘माझ्या डोक्यावर प.पू. गुरुमाऊलीचा हात असल्यामुळे मला लागले नाही.’’
२. वय ४ ते ६ वर्षे
२ अ. शिकण्याची वृत्ती : शिवांश कुठलीही गोष्ट पटकन शिकतो आणि लगेच तशी कृतीही करतो.
२ आ. हिंदु धर्माविषयी आदर असणे : एकदा शिवांशच्या शाळेत ‘हॅलोवीन’ (भुतांची वेशभूषा करण्याची ख्रिस्त्यांची प्रथा) साजरा करण्यात येणार होता. मी शिवांशला समजावून सांगितले, ‘‘ती आपली संस्कृती नाही. आपण असे भूत बनायचे नाही.’’ त्याला ते लगेच पटले. त्या दिवशी तो शाळेत गेला नाही. त्याने त्याच्या वर्गातील काही मुलांच्या पालकांना ‘ती आपली संस्कृती नाही’, असे सांगून त्यांचे प्रबोधन केले.
२ इ. राष्ट्राभिमान
१. ‘राष्ट्रध्वजाचा अपमान होईल’, असे तो कधीच वागत नाही. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशी मार्गावरून जाता-येता घाणीमध्ये पडलेला राष्ट्रध्वज शिवांश स्वतः उचलतो अन् पाण्यात विसर्जन करतो.
२. शिवांशला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायला पुष्कळ आवडते.
२ ई. आजोबांच्या निधनाच्या वेळी जाणवलेली शिवांशची प्रगल्भता ! : कोरोनाच्या कालावधीत माझ्या सासर्यांचे (शिवांशच्या आजोबांचे) निधन झाले. तेव्हा शिवांश केवळ ४ वर्षांचा होता. घरी बरेच पाहुणे आले होते. घरात पुष्कळ गोंधळ आणि रडारड चालू होती; पण हे सर्व पाहून शिवांश घाबरला नाही. तो शांत होता. त्याने मला कसलाही त्रास दिला नाही. तो त्याची आजी आणि पाहुणे यांना सतत सांगत होता, ‘‘कुणी रडायचे नाही.’’ तेव्हा ‘प्रत्यक्ष भगवंत त्याच्या माध्यमातून बोलत आहे’, असे मला जाणवत होते.
२ उ. नामजपावरील श्रद्धा
१. रात्री कधी कधी शिवांश झोपेत घाबरून रडत उठतो. तेव्हा तो मला नामजप लावायला सांगतो आणि नामजप लावल्यावर पुन्हा शांत झोपतो.
२. शिवांश प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो. अजून त्याला फारसे लिहिता येत नाही, तरी तो ‘राम’ हा नामजप वहीत लिहितो.
२ ऊ. भाव
२ ऊ १. मित्रांच्या समवेत खेळतांना त्याला श्रीकृष्ण, श्रीराम किंवा श्री हनुमान बनायचे असते. ‘ढगांमध्ये मला हनुमान दिसत आहे’, असे तो मला नेहमी सांगतो.
२ ऊ २. मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवलेल्या गणपतीच्या मूर्ती उचलून स्वच्छ ठिकाणी ठेवणे : एकदा मी शिवांशला घेऊन एका मंदिरात सेवेसाठी गेले होते. त्या मंदिराच्या बाहेर एका झाडाच्या पारावर खराब झालेल्या गणपतीच्या छोट्या मूर्ती होत्या. तिथे पुष्कळ मुंग्या होत्या. तेव्हा शिवांशने त्या मूर्ती उचलून स्वच्छ जागी ठेवल्या. तो आम्हाला म्हणाला, ‘‘तिथे पुष्कळ मुंग्या आहेत. आपण तिथे बसू शकत नाही, तर बाप्पाला तिथे कसे ठेवायचे ? म्हणून मी बाप्पाला उचलून स्वच्छ ठिकाणी ठेवले.’’
२ ऊ ३. आम्ही गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहात होतो. तेव्हा शिवांश मला म्हणाला, ‘‘आपण गुरुदेवांकडे कधी जायचे ? मलाही त्यांंना भेटायचे आहे.’’
३. स्वभावदोष : हट्टीपणा आणि चिडचिडेपणा’
– सौ. अश्विनी सूरज सूर्यवंशी (शिवांशची आई), खारघर, नवी मुंबई. (३.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |