चेन्नई (तमिळनाडू) येथे अनधिकृतपणे बांधलेल्या मशिदीवरील नावाची पाटी हटवली !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधाचा परिणाम !

प्रतिकात्मक छायाचित्र

चेन्नई (तमिळनाडू), ३ ऑक्टोबर (वार्ता) – येथील आर.के. नगरमधील सरकारी भूमीवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मशिदीच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर मशिदीवरील ‘मस्जिद महंमद गौस आसूसा’ या नावाची पाटी काढण्यात आली.

कोरुक्कुपेट्टाई भागातील सुनंबु कलवई किलिंजल स्ट्रीट येथे ही मशीद अनधिकृतपणे बांधण्यात आली आहे. हा हिंदूबहुल भाग आहेत. या मशिदीपासून ५० मीटर अंतरावर मुनीश्‍वरन् मंदिर, तर ८० मीटर अंतरावर अझागु मुथुमरीअम्मा मंदिर आणि एलाई मुथुमरीअम्मन मंदिर आहेत. मंदिरांच्या उत्सवांच्या वेळी काढण्यात येणार्‍या मिरवणुका या मार्गावरून जातात. त्यामुळे ‘या मार्गाच्या बाजूला अशा प्रकारे अनधिकृत मशीद बांधून धार्मिक तणाव निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे’, असा आरोप हिंदूंकडून केला जात आहे. या संदर्भात तमिळनाडू शिवसेना पक्षाचे श्री. व्ही. प्रभाकर, भारत हिंदू मुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभु, सर्व मंदिर संरक्षण समितीचे श्री. सी. गोपी, अकिला हिंदू मक्कल अमईप्पूचे श्री. व्ही.एम्. शिवकुमार, भारत मुन्नानीचे श्री. शिवाजी, अकिला भारत हिंदू मक्कल सेनेचे श्री. एम्. सेंथिल, हिंदु मंदिर संघटनेचे अध्यक्ष श्री. आर्.के. सतीश, दक्षिण भारतीय शिवसेनेचे आर्. कंदासामी, तमिळनाडू हिंदू मक्कल सेनेचे श्री. सरवणन्, सनातन भारत सेनेचे श्री. मणी, तमिळनाडू दलित मक्कल थयागमचे श्री. एम्. रागावबाबू आणि इतर हिंदू मित्र संघटनांनी २९ सप्टेंबर या दिवशी या मशिदीसमोर आंदोलन केले होते. त्यापूर्वी पोलिसांत तक्रारी केली होती.

संपादकीय भूमिका

  • हिंदु संघटनांनी केवळ पाटी हटवून थांबू नये, तर या अवैध मशिदीवर कारवाई होण्यासाठीही प्रयत्न करावा !
  • अवैधरित्या मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक (द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) सरकार याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची शक्यता अल्प आहे, हेही तितकेच खरे !