आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची घोषणा !
गौहत्ती (आसाम) – आमचा पक्ष पुढील १० वर्षे राज्यातील चार चोपरी भागातील मुसलमानांकडे मते मागणार नाही, अशी घोषणा भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी एका कार्यक्रमात केली.
एक कार्यक्रम में बोलते हुए #HimantaBiswaSarma ने कहा, ‘BJP को वोट देने वालों को 2-3 से अधिक बच्चे नहीं पैदा करने चाहिए. सभी को अपनी बेटियों को स्कूल भेजना चाहिए, बाल विवाह नहीं करना चाहिए और कट्टरवाद छोड़कर सूफीवाद अपनाना चाहिए.’ #Assamhttps://t.co/kwpbGnmg35
— The Lallantop (@TheLallantop) October 2, 2023
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की,
१. निवडणुका आल्या की, मी स्वत: त्यांना विनंती करीन की, ‘आम्हाला मतदान करू नका.’ जेव्हा तुम्ही कुटुंब नियोजनाचे पालन कराल, बालविवाहासारख्या प्रथा थांबवाल आणि कट्टरतावादाला आळा घालाल, तेव्हा आम्हाला मतदान करा आणि हे सर्व पूर्ण होण्यासाठी किमान १० वर्षे लागतील. त्यामुळे आता नाही, तर १० वर्षांनी मते मागू.
२. भाजपला मतदान करणार्या मुसलमानांना २-३ पेक्षा अधिक मुले नसावीत. त्यांनी मुलींना शाळेत पाठवावे, कट्टरतावाद सोडून सुफी धर्म स्वीकारावा. या अटींची पूर्तता झाल्यावर मी तुमच्याकडे मते मागायला चार चोपरी येथे येईन.