केंद्रीय निवडणूक आयोगाची नवीन नियमावली
जयपूर (राजस्थान) – केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या नव्या नियमामध्ये आता राजकीय पक्षांना ‘निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्याला उमेदवारी का दिली ?’, याचे स्पष्टीकरण वृत्तपत्रांतून द्यावे लागणार आहे. तसेच या उमेदवारांना त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रांतून विज्ञापनाद्वारे द्यावी लागणार आहे.
*राजस्थान में पहली बार बुजुर्ग-दिव्यांग घर से डाल सकेंगे वोट:* CEC बोले- राजनीतिक दलों को बताना होगा- क्रिमिनल को टिकट क्यों दिया https://t.co/cTsTpS7zdQ pic.twitter.com/tAgC0EhHV6
— Goverdhan Chaudhary (@Goverdhan__) October 1, 2023
याविषयी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी कटीबद्ध आहे. यासाठी गुन्हेगारांचा राजकारणातील प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊल उचलले आहे. गुन्हेगारांना पक्षाने उमेदवारी का दिली ? याचे उत्तर राजकीय पक्षांना सांगावे लागणार आहे. राजस्थानमध्ये पहिल्यांदाच वृद्ध मतदारांना, तसेच ४० टक्के विकलांग असलेल्या लोकांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सक्तीच्या मतदानाचा कोणताही प्रस्ताव निवडणूक आयोगापुढे नाही.
संपादकीय भूमिकायापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे ! |