चोपडा (जळगाव) येथे  ३० गणेशोत्‍सव मंडळांवर गुन्‍हा नोंद !

विलंबाने विसर्जन केल्‍याचा ठपका !

गणेशमूर्ती विसर्जन

चोपडा – येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्‍या दिवशी म्‍हणजे २३ सप्‍टेंबरला रात्री १२ नंतर श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्‍याचा ठपका ठेवत चोपडा पोलिसांनी तब्‍बल ३० सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांवर गुन्‍हा नोंदवला आहे. पोलिसांच्‍या या एकांगी कारवाईवर सर्वच स्‍तरांवरून तीव्र नापसंती दर्शवली आहे. ‘‘चिंचोळा विसर्जनमार्ग आणि मंडळांची वाढती संख्‍या पाहून एवढा कालावधी विसर्जनासाठी लागणे अपरिहार्य आहे. आम्‍ही सर्वतोपरी प्रशासनास सहकार्य केलेले असले, तरीही आमची बाजू समजून न घेता ही एकांगी कारवाई केली आहे’’, असे म्‍हणणे गुन्‍हा नोंद केलेल्‍या गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांचे आहे.

‘‘प्रथमपासून आम्‍ही प्रशासनाशी उत्तम समन्‍वय ठेवून यंदाचा गणेशोत्‍सव शांततेत आणि व्‍यवस्‍थित पार पडला. असे असतांना अशा प्रकारची कारवाई करणे अयोग्‍य आहे. ही कारवाई मागे घेण्‍यात यावी, अशी आमची मागणी आहे’’, असे चोपडा येथील सार्वजनिक गणेशोत्‍सव महामंडळाचे संयोजक श्री. गजेंद्र जैस्‍वाल यांनी म्‍हटले आहे.

संपादकीय भूमिका

वर्षभर सर्वोच्‍च न्‍यायालयाचे आणि प्रदूषण मंडळाचे नियम धाब्‍यावर बसवून ध्‍वनीप्रदूषण करणार्‍यांवर अशी कारवाई करण्‍याची तत्‍परता चोपडा पोलीस प्रशासन दाखवेल का ?