परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या सोहळ्‍यात सौ. स्‍वाती रामा गांवकर यांना वातावरणात जाणवलेले पालट !

केवळ दर्शनाने साधकांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘गुरुकृपेमुळे मला रामनाथी आश्रमात यायला मिळाले आणि त्‍या वेळी मला वातावरणात पुढील पालट जाणवले.

सौ. स्‍वाती गांवकर

१. आभाळातील ढग रामनाथी आश्रमाच्‍या दिशेने पुढे पुढे येत होते.

२. मंद गार वारा वहायला लागला होता.

३. सगळीकडे पक्षी आनंदाने उडत होते.

४. ढगात एक मोठी गणपतीची फेटा बांधलेली आकृती दिसली. जणू तीही दिंडीत सहभागी झाली होती. तिच्‍याजवळ आणखी एक गणेश बाळ दिसत होता.

५. ढगामध्‍ये ‘ॐ’ दिसला.

प्रत्‍येक क्षणी ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे कधी दर्शन घडणार ?’, असे वाटत होते आणि अकस्‍मात् त्‍यांचे भावपूर्ण दर्शन घडले. गुरुदेवांनी माझ्‍याकडे बघून स्‍मितहास्‍य केले. ते बघून माझे मन भरून आले. या जिवावर एवढी कृपा करून त्‍यांनी मला धन्‍य केले.’

– सौ. स्‍वाती रामा गांवकर (सौ. राधा गावडे यांची वहिनी), गोवा (३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक