सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या भक्‍तीसोहळ्‍यात रामनाथी आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांना आलेल्‍या अनुभूती

साधकांना भावानंद प्रदान करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. नृत्‍याच्‍या वेळी साधिकांनी श्रीविष्‍णूच्‍या मस्‍तकावर ओंजळ जोडून धरल्‍यावर ते दृश्‍य, म्‍हणजे तो अनेक मुखांचा शेषनाग असल्‍याचे जाणवणे

‘अच्‍युतं केशवं राम नारायणं कृष्‍ण दामोदरं..॥ या अच्‍युताष्‍टकाच्‍या भक्‍तीमय रचनेवर काही साधिका ‘रथारूढ श्रीविष्‍णूच्‍या रूपात असलेल्‍या गुरुदेवांपुढे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍यापुढे) नृत्‍यसेवा अर्पण करत होत्‍या. त्‍या नृत्‍यसेवेतील साधिकांनी नृत्‍यात शेषशायी असलेल्‍या श्रीविष्‍णूच्‍या चरणी पुष्‍पार्पण केल्‍याच्‍या मुद्रा केल्‍या. श्रीविष्‍णूच्‍या मस्‍तकावर शेषनाग दाखवण्‍यासाठी काही साधिकांनी त्‍यांचे हात उंचावून, थोेडे झुकवून, श्रीविष्‍णूच्‍या मस्‍तकावर ओंजळ जोडून धरले. त्‍यामुळे ‘तो अनेक मुखांचा शेषनाग आहे’, असे जाणवत होते.

२. स्‍वतःचा विसर पडून ‘नृत्‍य कोणत्‍यातरी निराळ्‍या उच्‍चलोकात चालू आहे’, असे जाणवणे

श्री. गुरुप्रसाद बापट

हे सर्व पहात आणि ऐकत असतांना माझी भावजागृती झाली. मला स्‍वतःचा विसर पडला. माझे मन निर्विचार झाले. मला देहबुद्धी नव्‍हती, तसेच काळाचे भानही नव्‍हते. व्‍यासपिठावरील भक्‍तीरसातील ‘नृत्‍यसाधना’ आणि चालूू असलेले भक्‍तीमय ‘अच्‍युताष्‍टकम्’ या दोन्‍हीत मी एकरूप झालो होतो. माझ्‍या मनाला आनंद आणि शांती लाभत होती. ‘हे सर्व कोणत्‍यातरी निराळ्‍या उच्‍चलोकांत चालू आहे’, असे मला जाणवत होते.

‘मला हा ब्रह्मोत्‍सव सोहळा प्रत्‍यक्ष पहायची संधी देऊन, उच्‍च कोटीची अनुभूती दिलीत, यासाठी गुरुदेव, मी तुमच्‍या चरणी आणि सर्व साधकांप्रति कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक