
ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारला आहे. या संदर्भात ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. बैठकीत ठाणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. विविध राजकीय पक्षांशी संबंधित मराठा समाजाच्या संस्था आणि संघटना यांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती ‘सकल मराठा मोर्चा’चे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिली.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !