पुणे येथे महिला पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा नोंद !

पुणे – सिंहगड रस्त्यावरील अभिरूची पोलीस चौकीतील महिला पोलीस निरीक्षकास धक्काबुकी केल्याप्रकरणी नीलेश भालेराव यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. सध्या नीलेश मुंबईतील पोलीस दलाच्या ‘फोर्स वन’ पथकात कार्यरत आहे. भालेराव यांचा महिला पोलीस निरीक्षकाशी वाद झाला होता. त्या वेळीही तक्रार प्रविष्ट केली होती; परंतु भालेरावच्या कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर तक्रार मागे घेतली; मात्र भालेराव दूरभाष करून त्रास देत होता. त्याला कंटाळून पोलीस चौकीमध्ये त्या तक्रार प्रविष्ट करण्यास आल्या असता भालेरावने धक्काबुक्की केली. त्यानंतर मात्र भालेराव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

महिला पोलीस निरीक्षकास पोलीस ठाण्यात धक्काबुक्की होणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पदच आहे. महिला पोलीस कर्मचारीच जेथे सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्य जनता पोलिसांपासून सुरक्षित राहील का ?