श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या चरणांवर डोके ठेवून नमस्‍कार केल्‍यावर साधिकेला आलेली अनुभूती !

‘श्रावण कृष्‍ण षष्‍ठी, म्‍हणजे ९.८.२०२० या दिवशी मला (कु. सोनल जोशी [वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४२ वर्षे]) माझ्‍या वाढदिवसानिमित्त श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना नमस्‍कार करण्‍याची संधी मिळाली. याविषयी देवाने मला दिलेली अनुभूती कृतज्ञतेच्‍या भावाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या चरणी अर्पण करते.

१. वाढदिवसाच्‍या निमित्ताने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला आणि त्‍यांचे आशीर्वाद घ्‍यायला जाणे अन् ‘त्‍यांना नमस्‍कार करू शकते का ?’, असे विचारल्‍यावर त्‍यांनी प्रेमाने होकार देणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘श्रावण कृष्‍ण षष्‍ठी (९.८.२०२०) या दिवशी मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना माझ्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने भेटायला आणि त्‍यांचे आशीर्वाद घ्‍यायला गेले होते. तेव्‍हा त्‍या सेवा करत होत्‍या. मी काही वेळ त्‍यांच्‍याशी मोकळेपणाने बोलले. बोलणे झाल्‍यावर मी त्‍यांना विनंती करून विचारले, ‘‘मी तुम्‍हाला नमस्‍कार करू शकते का ?’’ त्‍यांनी मला प्रेमाने होकार दिला.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना वाढदिवसाच्‍या निमित्ताने नमस्‍कार करतांना मन निर्विचार होऊन स्‍थिर झाले असल्‍याचे अनुभवणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ सेवेसाठी खाली बसल्‍या होत्‍या. मी त्‍यांना ‘‘नमस्‍कार करू का ?’’,असे विचारल्‍यावर त्‍या हळू उठून सुखासनावर (सोफ्‍यावर) बसल्‍या. काही क्षणातच मी त्‍यांच्‍या चरणांवर झुकले आणि माझे डोके त्‍यांच्‍या चरणांवर अलगद ठेवले. त्‍यांना नमस्‍कार करतांना मला ‘माझे मन स्‍थिर झाले असून माझ्‍या मनातील सर्व विचार नाहीसे झाले आहेत आणि माझे मन खोल खोल गेले आहे’, असे जाणवले.

३. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या चरणांवर डोके ठेवल्‍यावर आलेल्‍या विविध अनुभूती

कु. सोनल जोशी

अ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍या चरणांच्‍या स्‍पर्शातून माझ्‍या अंतरात एक भावाची लाट आली आणि मी त्‍या लाटेची शीतलता अनुभवत होते.

आ. ‘एक शक्‍ती ज्‍योतीच्‍या स्‍वरूपात माझ्‍या आत जात आहे’, असे मला दिसले. नंतर मला ही स्‍पंदने आनंद स्‍वरूपात अत्‍यधिक प्रमाणात जाणवत होती.

इ. मला त्‍यांच्‍या चरणांचा स्‍पर्श पुष्‍कळ मऊ वाटला. ‘हे चरण सोडूच नये’, असे मला वाटत होते. मी या स्‍थितीत बराच वेळ होते. थोड्या वेळाने मी माझ्‍या मनाला समजावून उठले. तेव्‍हा आतून ‘मला पुष्‍कळ काही मिळाले आहे’, असे मला जाणवत होते. त्‍यानंतर मी त्‍या स्‍थितीत झोपायला गेले.

ई. दुसर्‍या दिवशीही माझे मन निर्विचार स्‍थितीत होते. ही स्‍थिती मला ६ – ७ दिवस अनुभवता आली. त्‍यानंतरही मला ती स्‍थिती काही प्रमाणात अनुभवता येत होती. त्‍या वेळी ‘सेवेचेही विचार नकोत’, असे मला वाटत होते. मला आतून सतत नामजपाची शांतता जाणवत होती.

४. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍या भेटीनंतर साधिकेमध्‍ये झालेले पालट !

अ. आधी मला अहंच्‍या पैलूंचे प्रसंग लक्षात घेऊन त्‍यांवर मात करायला जमत नव्‍हते. आता मला ‘स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांवर मात करता येत आहे’, असे जाणवले.

आ. पूर्वी कुठल्‍याही प्रसंगाचा माझ्‍या मनावर लगेच परिणाम होत असे. ‘तो परिणाम काही प्रमाणात न्‍यून झाला’, असे मला जाणवले.

५. ‘सद़्‍गुरु आणि संत यांच्‍या चरणस्‍पर्शाने कसे लाभ होऊ शकतात ?’, हे साधिकेला प्रत्‍यक्ष अनुभवायला मिळणे

‘परात्‍पर गुरु, सद़्‍गुरु आणि संत यांच्‍या चरणस्‍पर्शाने कसे लाभ होऊ शकतात ?’, हे मला प्रत्‍यक्ष अनुभवायला मिळाले. त्‍यांच्‍यातील चैतन्‍याचे महत्त्व मला समजले. ‘संतांच्‍या केवळ अस्‍तित्‍वाने कार्य कसे होत असेल ? त्‍यांच्‍या सहवासात साधकांची आध्‍यात्मिक उन्‍नती कशी होत असेल ?’, हे मला या प्रसंगातून समजले.

‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर, तुम्‍ही आम्‍हाला साधना करायला शिकवत आहात; म्‍हणून आम्‍ही अशा आनंददायी अनुभूती घेऊ शकत आहोत. हा आनंद शब्‍दांत व्‍यक्‍त करता येत नाही. ‘असेच प्रयत्न आणि त्‍यांतील आनंद आम्‍हाला सतत घेता येऊ दे’, हीच तुमच्‍या चरणी कळकळीने प्रार्थना आहे.’

– तुमची,

कु. सोनल जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२९.१२.२०२०) (वर्ष २०२३ मधील आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के, वय ४२ वर्षे)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक