आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पाकिस्तानप्रेम !

मुंबई – एका पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी युवतीने भारतीय क्रिकेट संघातील लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या केलेल्या कौतुकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व पाकिस्तानी लोकांना भारतप्रेमाचे प्रमाणपत्र दिले आहे. या युवतीने केलेल्या कौतुकावरून आव्हाड यांना पाकिस्तानने आतापर्यंत केलेल्या आतंकवादी कारवायांचे विस्मरण होऊन त्यांनी ‘आपल्याकडे (भारतात) कुणी बाबर आझम (पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कप्तान) याचे कौतुक केले, तर त्याची कबर खोदतील’, असे समस्त भारतियांना पाकिस्तानीद्वेषी ठरवणारे ट्वीट केले आहे.
२ सप्टेंबर या दिवशी नेपाळमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेटचा सामना पहाण्यासाठी ही पाकिस्तानी युवती आली होती. सामना झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांपुढे या युवतीने विराट कोहलीचे भरभरून कौतुक करत ‘बाबर आझम आणि विराट कोहली यांतील एकाची निवड करायची झाल्यास विराट कोहली याची निवड करीन’, असे म्हटले. या युवतीच्या वक्तव्यावरून ‘ही पाकिस्तानी मुलगी मनमोकळेपणाने विराटची स्तुती करत आहे’, असे आव्हाड यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.
नेटकर्यांनी आव्हाड यांना फटकारले !
जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्वीटवरून नेटकर्यांनी त्यांना फटकारले आहे. ‘ तुमच्या मतदारसंघाला खुश करायला बरे आहे’, ‘तुम्ही औरंग्याची स्तुती करता तरी निवांत आहात’, ‘पाकिस्तानी म्हटली की, कळवळा येणारच ना तुम्हाला’, ‘कशाला कुणाची गरज आहे. बाबर आझम कशाला, तुम्ही तर बाबर, अकबर, खिलजी, औरंगजेब सगळ्यांचे कौतुक करता’, अशा ‘ट्वीट’द्वारे नेटकर्यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !